मुलाखत
मुख्य परीक्षेत आयोगाच्या निकालानुसार प्राप्त उमेदवारांची मौखिक व व्यक्तिमत्व चाचणी (INTERVIEW) घेण्यात येतात. यासाठी १०० गुण असतात.पूर्व परीक्षा ही फक्त एक चाळली परीक्षा असते. पूर्व परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोजले जात नाहीत. अशाप्रकारे पूर्व परीक्षेतील गुणांची बेरीज न करता फक्त मुख्य व मुलाखत यातील गुणांवर आधारित अंतिम यादी आयोग जाहीर करत असतो.